जीविका हेल्थकेअरने जेव्हा भारतात सब्सिडाइज्ड व्हॅक्सिनेशन प्रोग्रॅम (सवलतीच्या दरात लसीकरण) राबवण्याची संकल्पना मांडली, तेव्हा इंडियन इन्स्टट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सेंटर फॉर हेल्थ इंटरप्रेन्युअरशिप या प्रतिष्ठित संस्थानची साथ लाभली आणि तिथेच आज जीविका हेल्थकेअरचं संगोपन आणि वाढ होत आहे.
याचाच परिणाम म्हणून जीविका हेल्थकेअरने २०१९ साली ‘व्हॅक्सिन ऑन व्हील्स’ ही भारतातली पहिली डॉक्टरयुक्त मोबाईल व्हॅक्सिनेशन सर्व्हिस सुरु केली. आणि तेव्हापासूनच आम्ही न्याय्य आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा प्रस्तुत करण्यात नेहमीच अग्रणी राहिलो आहोत. आम्ही आजपर्यंत ६ राज्यातील दुर्गम अश्या ४० पेक्षा जास्त जिल्ह्यांमधील, २५ लाख लोकांना सेवा देण्यात यशस्वी झालो आहोत. व्हॅक्सिन ऑन व्हील्स, किमो ॲट होम, आणि खाजगी-सरकारी पार्टनरशिप द्वारे, परवडणारी आरोग्यसेवा परिसंस्था प्रस्थापित करण्यासाठी, आणि प्रत्येक स्तरातील लोकांना सेवा देता यावी यासाठी अविरत प्रयत्न करत आहोत.
२०२० मध्ये भारतात बालमृत्यूचे प्रमाण दर १००० जन्मांमागे ३२.६ होते. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे, हे प्रमाण दरवर्षी कमी होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. पण हा आकडा शून्याकडे न्यायचा असेल, तर फक्त सरकारी लसीकरणावर विसंबून चालणार नाही. कारण सर्वच आजारांसाठीच्या लसी, सरकारी लसीकरणात मिळत नाहीत. धोका अजूनही असतो, टायफॉईड, हेपेटायटिस ए (कावीळ), जपानी एन्सेफलायटिस, कांजिण्या, मेंदूज्वर, इन्फ्लुएंझा यासारख्या भीषण आजारांचा. म्हणूनच जीविका हेल्थकेअर घेऊन आलं आहे जीविका संपूर्ण लसीकरण योजना.
अधिक माहिती मिळवाजीविका संपूर्ण लसीकरण योजना तुमच्या लाडक्या मुलांना देते ६ आजारांपासून संरक्षण. हे आजार आहेत - टायफॉईड, हेपेटायटिस ए (कावीळ), जपानी एन्सेफलायटिस, कांजिण्या, मेंदूज्वर आणि इन्फ्लुएंझा
या सर्व लसी तुम्हाला मिळतील सब्सिडाईझ्ड म्हणजेच सवलतीच्या दरात
इतकंच नाही तर या लसी घेण्याकरिता तुम्हाला मिळणार आहे सुलभ हप्त्यांची सुविधा. म्हणजे तुम्हाला लस घ्यायच्या प्रत्येक महिन्यात भरायचे आहेत फक्त रु. १८२०
तुमच्या सोयीसाठी आणि वेळोवेळी मदत करण्यासाठी आम्ही नेमल्या आहेत जीविकाताई. त्या देतील तुम्हाला संपूर्ण योजनेची योग्य माहिती, आणि लस घेण्यासाठी वेळोवेळी सूचना
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, ही लसीकरण सुविधा असणार आहे तुमच्या घराच्या अगदी जवळ